डोंबिवलीत शिवसेना शहरप्रमुखांवर हल्ला, गाडीची केली तोडफोड

October 31, 2015 3:00 PM0 commentsViews:

dombiwali sena431 ऑक्टोबर : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला असून उद्या मतदान होणार आहे. पण आखाडा अजूनही तापलेलाच आहे.

डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 50 मधील चाळीमध्ये रात्री उशिरा काही जणांनी शिवसेना शहरप्रमुख भाऊ चौधरी यांची गाडी फोडली आणि हवेत गोळीबार केला असा आरोप शिवसेनेचे नेते म्हात्रे यांनी केलाय. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अज्ञात 19 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close