म्हाडाची लॉटरी लागलेल्यांना हायकोर्टाचा दिलासा

February 4, 2010 10:54 AM0 commentsViews: 1

4 फेब्रुवारीम्हाडाच्या घराची लॉटरी लागलेल्या लोकांना मुंबई हायकोर्टानं दिलासा दिला आहे. म्हाडाने 2009मध्ये 3 हजार 863 घरांची सोडत काढली होती. पण या ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेच्या विरोधात हायकोर्टात एक याचिका दाखल झाली होती. त्यात या सोडत पद्धती बद्दल आक्षेप घेण्यात आला होता. या याचिकेवर हायकोर्टानं निकाल दिला आहे. आणि या निकालात म्हाडाची सोडत योग्य प्रकारे झाल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.सखाराम किनवटकर यांनी या लॉटरी पद्धतीविषयी आक्षेप नोंदवला होता. ज्यांची आर्थिक स्थिती म्हाडाचे घर घेण्याइतपत सक्षम आहे, त्यांनाच फॉर्म्स दिले जावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. पण कोर्टाने त्यांची मागणी फेटाळली. त्यामुळे म्हाडाची सध्याची लॉटरी प्रकिया कायम राहणार आहे.

close