कोल्हापूरमध्ये फोटोग्राफरची आत्महत्या, चिट्ठीत भाजप नगरसेवकाचा उल्लेख

October 31, 2015 6:13 PM0 commentsViews:

KOL_SUSIDE31 ऑक्टोबर : कोल्हापूरमध्ये ऐन निवडणुकीच्या धामधूमीत एका फोटोग्राफरनं आत्महत्या केल्यानं एकच खळबळ माजलीय.

फोटोग्राफर आनंद चौगुले यांनी आपल्या फोटो स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. आनंद फोटो स्टुडिओ मध्ये चौगुले यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. यात भाजपचे विद्यमान नरसेवक आर.डी.पाटील यांच्या नावाचा उल्लेख असल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय.

पोलिसांनी आनंद चौगुले यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवला आहे. तर सुसाईड नोटमधील अक्षर हे चौगुले यांच आहे का याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी हस्तलिखीत तज्ञांकडून तपास सुरू केलाय.

सध्या या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल नसून पोलीसांकडून तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान, फोटोग्राफरच्या या आत्महत्येनं सेना-भाजपमध्ये नव्या वादाला उधाण आलंय. चौगुले यांच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना आक्रमक झालीय. भाजप नगरसेवकांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असं सांगत खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close