…तर घराबाहेर निघणंही मुश्किल होईल, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना इशारा

October 31, 2015 6:20 PM0 commentsViews:

pankaja munde31 ऑक्टोबर : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंच्यात शाब्दीक युद्ध सुरूच आहे. जर चौकशी सुरू केली तर घराबाहेर निघणंही मुश्किल होईल असा इशाराच पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना दिला. अहमदनगरला कर्जत पंचायतच्या निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादीचे नेते एकापाठोपाठ जेलमध्ये जाणार आहे. त्यामुळं छोट्या कार्यकर्त्यांना मोठी पदे देऊन त्यांना फिरवत असल्याचा टोला त्यांनी धनंजय मुंडेंना लगावला. 70 हजार कोटीच्या घोटाळ्यामुळे पाणी टंचाई असून शेतकरी आत्महत्या करतायत. स्वतःची बदनामी टाळण्यासाठी लोकप्रिय नेते आणि सरकारवर आरोप करत आहेत. पण त्यांची चौकशी सुरू केली तर घराच्या बाहेर निघणंही मुश्कील होईल, असा इशाराही त्यांनी दिलाय.

परळीच्या पाणीपुरवठा योजनेच्या फंडावर डोळा ठेऊन त्यांनी घरच्या माणसाला दगा दिला जे रक्ताचे झाले नाही ते जनतेचे कसे होणार, असा सवाल करत धनंजय मुंडेंवर पंकजांनी हल्ला केलाय. स्वतःच्या मतदारसंघात कोणी विचारत नसल्यानं नेत्यांना खुश करण्यासाठी ते इतरत्र फिरत असल्याचा टोलाही लगावला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close