देवेंद्र फडणवीस उथळ मुख्यमंत्री, शिंदेंचा घणाघात

October 31, 2015 8:35 PM0 commentsViews:

shinde vs cm 33331 ऑक्टोबर : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यात. मात्र अजूनही शिवसेना भाजपमध्ये ‘सामना’ सुरूच आहे. आम्हाला नैतिकतेचे धडे देण्याची गरज नाही. माझ्या कारकिर्दीत इतके उथळ मुख्यमंत्री मी पाहिला नाही अशी घणाघाती टीका शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना केली.

केडीएमसीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा पाहायला मिळाला .भाजपच्या दडपशाही कंटाळून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंनी मात्र राजीनामा स्वीकारला नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली. आमच्या उमेदवारावर हल्ले केले, लातूरमध्ये आरटीआय कार्यकर्त्यांना मारहाण केली ही कोणती संस्कृती आहे. हा कोणता दहशतवाद आहे. मुळात ही नाटककंपनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करून आम्हालाच दहशतवादी ठरवत आहे. पण निवडणूक निवडणुकीच्या जागी आहे. आमच्याही कार्यकर्त्यांनी काही बांगड्या भरलेल्या नाही. कायदा सुव्यवस्था राखली जावी म्हणून संयम बाळगूण आहे अशी टीका मुख्यमंत्र्यांनी शिंदेंचं नाव न घेता केली होती. तसंच शिंदेंनी राजीनामा दिला यापेक्षा मोठा विनोद होऊ शकत नाही अशी खिल्लीही मुख्यमंत्र्यांनी उडवली होती.

याला प्रत्युत्तर देत शिंदे म्हणाले, आम्ही कुणावर हल्ले केले नाही. पण एका सर्व्हेनुसार भाजपमध्येच सर्वात जास्त गुंड असून भाजपच गुंडांचा पक्ष आहे असं एका सर्व्हेतून समोर आलंय. मुख्यमंत्री जर कायदा सुव्यवस्थेची चर्चा करत आहे तर आपल्याच पक्षात डोकावून पाहावं असा पलटवार शिंदेंनी केला. तसंच मुख्यमंत्र्यांना मी चांगला माणूस समजत होतो. पण या निवडणुकीत ते किती खोटारडे आहे ते समोर आलंय. मला उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद दिलंय. मी, त्यांच्याकडे राजीनामा देईल. मुख्यमंत्र्यांनी मला उपदेश देण्याची गरज नाही. माझ्या कारकिर्दी
त इतका उथळ मुख्यमंत्री पाहिला नाही. आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले ते लोकांचं ऐकून घ्यायचे पण फडणवीस त्याला अपवाद आहे अशी टीका शिंदेंनी केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close