छोटा राजन येत्या ७२ तासांमध्ये भारताच्या ताब्यात

November 1, 2015 11:39 AM0 commentsViews:

rajan_bali_jail01 नोव्हेंबर : कुख्यात गँगस्टर छोटा राजन ऊर्फ राजन निकाळजेला भारतात परत आणण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. येत्या 72 तासांमध्ये राजनला भारतात परत आणण्याची शक्यता आहे. सीबीआयची टीम इंडोनेशियाला रवाना झाली आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारानुसार राजनला भारताच्या ताब्यात सोपवण्यात येणार आहे. मागील आठवड्यात राजनला बालीमध्ये इंडोनेशियन पोलिसांनी अटक केली होती. राजनवर भारतात मुंबई बॉम्बस्फोट, पत्रकार जे.डे हत्याप्रकरणासह इतर अनेक खटल्यांमध्ये गुन्हे दाखल आहे. राजन भारतात आल्यानंतर त्याला बोगस पासपोर्ट प्रकरणात एनआयएच्या तावडीत देण्यात येणार आहे. राजनच्या अटकेमुळे दाऊदच्या काळ्या कृत्याबाबत काही माहिती मिळते का हेही तपास यंत्रणेपुढे महत्वाचं आव्हान असणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close