जीन्स- टी शर्ट घालते म्हणून पुण्यात पतीने केली पत्नीची हत्या

November 1, 2015 1:09 PM0 commentsViews:

PUNE murder

01 नोव्हेंबर : पत्नी जीन्स आणि टी-शर्ट वापरत असल्याचा राग मनात धरून पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलीये. पुण्यातल्या इंदिरानगर इथं मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये उघडकीस आली. पत्नीचा खून केल्यानंतर पती पसार झाला आहे. स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा रणजित निशाद (वय 23, इंदिरानगर, गुलटेकडी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. तिचा पती रणजित निशाद (वय 25) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशाद मूळचा उत्तर प्रदेशातील फैजाबादचा असून महिन्यापूर्वीच तो पुण्यामध्ये राहण्यासाठी आला होता. पूजाने जीन्स पँट आणि टी-शर्ट घातलेलं रणजीतला आवडत नव्हतं. त्यातून त्यांच्यात वाद व्हायचे. मंगळवारीही त्यांच्यात भांडण झालं. त्या वेळीही पूजाने जीन्स, टी-शर्टच घातलं होतं. त्यानंतर दुसर्‍या दिवशी रणजित घरातून बाहेर पडल्याचे स्थानिकांनी पाहिले होते. निशाद दाम्पत्याचे घर बुधवारपासून बंदच होते. मात्र घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांनी दिली. पोलिसांनी दरवाजा उघडल्यावर पूजाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close