‘गाभ्रीचा पाऊस’चा गौरव

February 4, 2010 12:02 PM0 commentsViews: 3

4 फेब्रुवारीगाभ्रीचा पाऊस हा सिनेमा आता नव्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.फ्रान्सचा डी विसोल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वात उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार या सिनेमाला जाहीर झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शक सतीश मनवर यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. दिग्दर्शक म्हणून सतीशचा हा पहिलाच सिनेमा आहे. विदर्भातील शेतक-यांच्या आत्महत्यांच्या प्रश्नाकडे या सिनेमातून लक्ष वेधण्यात आले आहे. सिनेमात एक शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाची जगण्याची धडपड पाहायला मिळते. गिरीश कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.यापूर्वी गाभ्रीचा पाऊस रोटरडॅम फिल्म फेस्टिव्हल तसेच इतरही अनेक फेस्टिव्हलमध्ये दाखवला गेला आहे.

close