‘सामना’तील लिखाणाचा तपास करणार- आर. आर.

February 4, 2010 12:29 PM0 commentsViews: 2

4 फेब्रुवारीशाहरुख प्रकरणावरून शिवसेनेच्या सामना या दैनिकातून गेले काही केल्या जाणा-या चिथावणीखोर लिखाणाची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहेत. गेल्या 15 दिवसांतील असे लिखाण तपासून पाहण्याचे आदेश गृहमंत्री आर. आर पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर केलेले सर्व लिखाण राज्य गुप्त वार्ता विभाग, कायदा व सुव्यवस्थेचे महासंचालक आणि न्याय व विधी खाते तपासून बघणार आहे. याबाबत कोणत्या कायद्यातंर्गत कारवाई करता येईल हे ऍडव्होकेट जनरल यांच्याकडून तपासून पाहावे, अशा सूचनाही गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत. मराठीचा मुद्दा गौण आहे. केवळ मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच शिवसेनेकडून भावना भडकण्याचा प्रकार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच शाहरूख खान जिथे मागतील तिथे सुरक्षा पुरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

close