…तर आम्हीही रस्त्यावर उतरू – मुख्यमंत्री

February 4, 2010 12:54 PM0 commentsViews: 3

4 फेब्रुवारीशिवसेनेला विरोध करण्यासाठी आम्हीही रस्त्यावर उतरू असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला आहे. नवी मुंबई इथे काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला आहे.राहुल गांधी यांना विरोध करण्यासाठी निदर्शने करण्याच्या शिवसेनेच्या इशा-याविरोधात आता मुख्यमंत्रीही आक्रमक झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या टीकेला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. राहुल आणि सोनिया गांधींवर वाट्टेल ती टीका सुरू आहे. ती आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवसेना मुकेश अंबानी, सचिन, शाहरुख खान यांच्या मागे लागली. आता राहुल गांधींना टार्गेट करण्याचे काम सुरू आहे, आम्ही आता हे सहन करणार नाही.भाषावाद निर्माण करुन समाजात दुही पसरवणे सुरू आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेला हा मार्ग मान्य नाही. म्हणूनच त्यांनी आम्हाला निवडून दिले, असा टोलाही चव्हाण यांनी यावेळी लगावला.

close