जायकवाडी धरणाला नाशिक, नगरचे पाणी

November 1, 2015 8:32 PM0 commentsViews:

jayakwadi dam_news

01 नोव्हेंबर : दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून रविवारी रात्री पाणी सोडले जाणार आहे.  धरणातून किती प्रमाणात पाणी सोडायचे यासंदर्भातील जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असून या पार्श्वभूमीवर गोदावरी काठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नगर जिल्ह्यातील भंडारदरा व निळवंडे तर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व अन्य धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी – मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने घेतला होता. मात्र स्थानिक नेत्यांनी याविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई हायकोर्टाने दोन दिवसांपूर्वी या निर्णयाला स्थगित देण्यास नकार दिल्याने जायकवाडीला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. यानुसार रविवारी रात्री नाशिक व नगरमधील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडले जाणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close