कोल्हापुरात काँग्रेस -राष्ट्रवादी एकत्र येणार

November 2, 2015 4:36 PM1 commentViews:

Congress NCp

02 नोव्हेंबर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला. मात्र,काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. काँग्रेस 27 जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीने 15 जागा जिंकल्यात.  त्यामुळे काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी आपल्या मित्रपक्षाला हाक दिलीये.

काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. आमच्यात सकारात्मक चर्चा झाली असून राष्ट्रवादीला सत्तेत सहभागाबद्दल विनंती केली असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली. आयबीएन लोकमतशी बोलतांना सतेज पाटील यांनी राष्ट्रवादी मागील वेळीही सोबत होती. त्यामुळे त्यांनी यावेळी सोबत यावं अशी इच्छा बोलून दाखवली.

तर दुसरीकडे ताराराणी पक्षाने 20 जागा जिंकून दुसऱ्या स्थान पटकावले. ताराराणीने महायुतीचा महापाैर होईल असा दावा करत महायुतीच्या हालचालींना सुरुवात केली. पण आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तेसाठी एकत्र येण्याची तयारी सुरू केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • http://www.ibnlokmat.tv/ Yuvraj

    कल्याण डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांनी वाघाच्या तोंडात हात घालून दात मोजले आहेत…. आता वाघ मांसाळंतो का नर्भक्शि होतो हे जसे कमळाबाई च्या मनगटे वर डोलणारे घड्याळ ठरविणार आहे .. तसेच कोल्हापुरात पंजा च्या ओर्बाड्याने निघालेले कमळाबाई चे रक्त मात्र आता वाघाच्या तोंडी लागलं आहे.. इंजीन ने लवकर शिट्टी मारली तर धनुष्यातून बाण सुटायला वेळ लागणार नाही !!

close