कोण होणार कोल्हापूरचा ‘सुभेदार’ ?

November 2, 2015 9:45 AM0 commentsViews:

kolhapur3302 नोव्हेंबर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत कल्याण डोंबिवलीप्रमाणेच शिवसेना आणि भाजप स्वबळावर मैदानात उतरले त्यामुळे सत्तेत असलेल्या या दोन्ही पक्षांची प्रतिष्ठापणा लागलीये. कोल्हापूरच्या आखाड्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद शेवटपर्यंत हमरीतुमरीवर आले. कोल्हापूरकरांनी भरभरून मतदान तर केलंय त्यामुळे ते आता कुणाला सुभेदारी देता हे पाहण्याचं ठरणार आहे.

मागील निवडणुकीच्यावेळी 65 टक्के मतदान झालं होतं यावेळी ते वाढलेलं पाहायला मिळालं यावेळी करवीरवासियांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. यावेळची टक्केवारी 68.80 इतकी आहे. कोल्हापुरात 81 जागांसाठी निवडणूक होत आहे. कोल्हापुरात 81 प्रभागांसाठी 506 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. कोल्हापुरात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढतायत तर भाजपने स्थानिक ताराराणी आघाडीशी हातमिळवणी करुन निवडणूक लढली. प्रचारात महागाई, हद्दवाढ, टोल, गुन्हेगारी हे मुद्दे गाजले होते. या निवडणुकीत कोल्हापुरात चार पक्षाच्या पाच प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा प्रणाला लागली आहे. भाजपचे नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि काही अंशी महादेवराव महाडीक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close