अखेर जायकवाडीला पाणी सोडलं, नगरमध्ये जमावबंदी लागू

November 2, 2015 9:58 AM0 commentsViews:

jaikwadi dam_water02 नोव्हेंबर : नाशिक आणि नगर जिल्हातला विरोध कायम असला तरी कोर्टाने आदेश दिल्यावर जायकवाडीला पाणी सोडण्यात आलं. भंडारदरा आणि निळवंडे या धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आलंय. निळवंडे धरणातून दोन हजार क्युसेक्सनं पाणी सोडण्याला सुरुवात झाली आहे. ते पुढच्या आठ दिवसांत जायकवाडीत पोहचेल असं सांगण्यात येतंय. वाढता विरोध पाहता अहमदनगर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. मुळा खोर्‍यात 4 तारखेपर्यंत प्रवरा तर खोर्‍यात 12 तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत.

दरम्यान, गंगापूर धरण आणि हतनूर धरणातुनही पाणि सोडण्यात येत आहे. पण अजुनही जायकवाडीसाठी पाणी सोडण्याला नाशिक आणि नगरचा विरोध आहे. जिल्हाप्रशासनाकडून पाणी सोडण्याचे आदेश मिळताच नाशिकचे प्रतिनिधी आणि शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निवासस्थानाबाहेर आपला विरोध नोंदवला. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील पाणी जायकवाडीला सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देणारी याचिका 31 ऑक्टोबरला हायकोर्टाने फेटाळली होती. आणि हे पाणी केवळ पिण्यासाठी दिलं जावं तसंच प्रवाहाच्या मार्गात पाण्याचं नुकसान होणार नाही याची काळजी राज्य सरकारनं घ्यावी असंही कोर्टानं नमूद केलंय पण अजुनही नाशिकरांचा विरोध कायम आहे. अहमदनगर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. मुळा खोर्‍यात 4 तारखेपर्यंत प्रवरा तर खोर्‍यात 12 तारखेपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. मराठवाड्याला पाणी सोडण्याला नगरच्या नेत्यांच्याही विरोध आहे. तसंच नदीवर ठिय्या आंदोलन करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close