‘त्या’ रशियन विमानाचे हवेतच तुकडे झाले ?

November 2, 2015 9:33 AM0 commentsViews:

sinai_rashin_plen crash02 नोव्हेंबर : आणखी एका विमान दुर्घटनेनं अवघ्या जगाला हादरा बसला. शनिवारी संध्याकाळी रशियन एअरलाईन मेट्रोजेटचं एक विमान इजिप्तमध्ये कोसळलं. रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनं अशी माहिती दिली आहे की विमानाचे हवेतच तुकडे झाले असावेत.

याचं कारण म्हणजे विमानाचे अवशेष 20 स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरात पसरले आहेत. अपघाताचं कारण अजूनही कळू शकलेलं नाही. या दुर्घटनेत एकूण 224 जणांचा मृत्यू झालाय, ज्यात 25 लहान मुलंही होती.

विमान रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग या शहराकडे निघालं होतं. मृत्यूमुखी बहुतांश प्रवासी हे सुट्टीहून परतत होते. या विमानाचा ब्लॅक बॉक्स भेटल्याचा दावा करण्यात आलाय. पण, रशियाने याबद्दल अजूनही दुजोरा दिला नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close