‘इंजिन’ घसरलं पण, तरीही फॉर्मात ?

November 2, 2015 5:15 PM0 commentsViews:

Raj thackray banner02 नोव्हेंबर : ‘माझ्या हातात पूर्ण सत्ता द्या, विकास घडवून दाखवतो…’ असं आवाहन करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेचं ‘इंजिन’ कल्याण-डोंबिवलीभर फिरवलं खरं पण, मतदाराजाने ‘इंजिन’ला टाटा करत ‘कल्याण जंक्शन’वर थांबण्यास नकार दिला.

त्यामुळे मागील निवडणुकीत 27 ‘डब्यांना’ घेऊन निघालेलं ‘इंजिन’ अवघ्ये 9 डबे घेऊन यार्डात लागलंय. पण, तरी मनसेच्या वाट्याला आलेल्या 9 जागा महत्वाची भूमिका बजावणार आहे.

मनसेचे 9 उमेदवार निवडून आले तर 1 पुरस्कृत उमेदवार विजयी झालाय. म्हणजे मनसेनं 10 जागा जिंकल्या आहे. दुसरीकडे शिवसेनेला बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजप सेनेला साथ देते की मनसे सेनाला पाठिंबा देते हे महत्वाचं ठरणार आहे. एकंदरीत मनसे आता किंगमेकरची भूमिका बजावते का हे पाहण्याचं ठरणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close