सीमा परिषदेवरून बेळगाव तापले

February 4, 2010 3:20 PM0 commentsViews: 1

4 फेब्रुवारीउद्या बेळगावात होणा-या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा परिषदेवरून वातावरण जोरदार तापले आहे. अजूनही या परिषदेला कर्नाटक सरकारने परवानगी दिलेली नाही. तर दुसरीकडे या परिषदेला विरोध करण्यासाठी कन्नड वेदिकेच्या महिला कार्यकर्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. शहरातील चन्नमा चौकात कन्नड वेदिकेच्या महिला कार्यर्त्यांनी निदर्शने केली. याच वेळी एका महिलेने गळ्याला फास लावून घेण्याचा प्रयत्न केला. इतर कार्यकर्त्यांनी तिला आत्महत्या करण्यापासून रोखले. सध्या बेळगावात तणाव कायम आहे. शीघ्र कृती दलाने आज शहरात संचलन केले. एकीकरण समितीच्या परिषदेसाठीमहाराष्ट्रातील अनेक नेते बेळगावला जाणार आहेत.

close