कार्यकर्त्यांवरील हल्ल्याची गंभीर दखल

February 4, 2010 3:32 PM0 commentsViews: 2

4 फेब्रुवारीसामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येनंतर मुंबई हायकोर्टाने सामाजिक कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांची गंभीर दखल घेतली आहे. अशा हल्ल्यांमध्ये जे सामाजिक कार्यकर्ते जखमी झालेत आणि ज्यांना धमक्या मिळाल्या आहेत, त्या लोकांची माहिती सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने आज राज्य सरकारला दिले आहेत. एफ. आय. रिबेलो आणि जे. एच. भाटीया यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे. सतीश शेट्टी हत्या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई कोर्टाने हा आदेश दिला आहे.माहितीच्या अधिकाराचा वापर करून लोकहिताची कामे करणा-या तळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शेट्टी यांची निर्घृण हत्या झाली होती. या प्रकरणाची सध्या कोर्टात सुनावणी सुरू आहे.

close