खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल

November 2, 2015 7:26 PM0 commentsViews:

Chandrakant on tahasilfatr

02 नोव्हेंबर : शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खैरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

औरंगाबाद शहरातील अतिक्रमण कारवाईला विरोध करीत खासदार खैरे यांनी तहसीलदारासह शासकीय कर्मचार्‍यांना शिवीगाळ केली होती. यावेळी शासकीय कामातही त्यांनी अडथळा आणला होता. याप्रकरणी खैरे यांच्याविरोधात आज अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे एकीकडे कल्याण-डोंबिवलीच्या विजयाचा राज्यभरातील शिवसैनिकांकडून आनंदोत्सव साजरा केला जात असताना खैरे यांच्यावरील कारवाईने औरंगाबादेतील शिवसैनिकांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close