नवी दिल्लीत आज काँग्रेसचा ‘निषेध मोर्चा’

November 3, 2015 7:54 AM0 commentsViews:

Sonia protest

03 नोव्हेंबर : वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर सरकारची आणखी कोंडी करण्यासाठी काँग्रेसतर्फे आज निषेध मोर्चा काढणार आहे. संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा हा निषेध मोर्चा असणार आहे. या मोर्च्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे.

उत्तर प्रदेशात दादरीमध्ये मुस्लीम व्यक्तीची हत्या झाल्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी त्या हत्येबद्दल असंवेदनशील वक्तव्यं केली होती. आणि त्याचा निषेध म्हणून अनेक कलाकार, विचारवंत, इतिहासकार आणि शास्त्रज्ञांनी सरकारकडून मिळालेले पुरस्कार परत केले होते. यामुळे असहिष्णुतेच्या मुद्द्यावर सरकार अक्षरश: घेरलं गेलं आहे. खुद्द राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही वाढत्या असहिष्णुतेवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राष्ट्रपतींनाच साकडे घालण्याचं ठरवलं असून, त्यासाठी आज राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढली जाणार आहे. यामध्ये सोनिया गांधी, राहुल गांधींसह कार्यकारिणीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, खासदार, प्रदेशाध्यक्षही सहभागी होणार आहेत. दरम्यान, वर्षभरात अशा प्रकारे निषेध मोर्चा काढण्याची काँग्रेसची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी भू-संपादन विधेयकावरचा अध्यादेश रद्द करण्यासाठी काँग्रेस नेते रस्त्यावर उतरले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close