कल्याण डोंबिवलीत शिवसेना-मनसे एकत्र येणार?

November 3, 2015 8:35 AM0 commentsViews:

KDNC SHIVSENA MNS

03 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवलीत शिवसेनेच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून सत्तेस्थापनेसाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात रात्री उशीरा शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये बैठकही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी सत्तास्थापेनासाठी आवश्यक असलेली मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिवसेनेला ‘टेकू’ लागणार आहे. यासाठी शिवसेना भाजपाची मदत घेणार की मनसेची याबाबत कमालीची उत्सुकता आहे. सत्तास्थापनेसाठी शिवसेना मनसेचा टेकू घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री उशीरा शिवसेना नेते अनिल परब आणि नितीन सरदेसाई यांच्यात बैठक झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, संघर्ष समिती आणि अपक्ष आमच्यासोबत असल्याचे शिवसेनेचे नेते खा. अनिल देसाई यांनी म्हटले आहे. संघर्ष समिती व अपक्षांच्या पाठिंब्यांमुळे शिवसेनेचे बलाबल ६८ पर्यंत जाईल असा दावाही त्यांनी केला. 

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी 3 वाजता आपल्या सर्व आमदार आणि खारदारांसोबत मातोश्रीवर बैठक घेणार आहेत. या बैठकीत सत्तास्थापनेच्या रणनितीवर चर्चा होईल हे निश्चित. प्रतिष्ठेची बनवलेली कल्याण डोंबिवली निवडणूक भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्रपणे लढवली आहे. प्रचारावेळी भाजप आणि शिवसेनेतील वाकयुद्ध चांगलेच रंगले होते. तसेच, स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजपशी युती करायला तीव्र विरोध आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close