आमदार बच्चू कडूंची पोलीस उपअधिक्षकांना शिवीगाळ

November 3, 2015 11:48 AM0 commentsViews:

03 नोव्हेंबर : अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पोलीस उपअधीक्षकांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उस्मानाबादमध्ये उघडकीस आला आहे. अपंगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर काढलेल्या मोर्चा दरम्यान हा प्रकार घडला.

bachu kadu1

अपंगांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, एकही जबाबदार अधिकारी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी हजर नव्हता. त्यामुळे बच्चू कडू काही कार्यकर्त्यांसह मुख्याधिकार्‍यांच्या कक्षेत घुसले. तसंच कार्यकर्त्यांनी थेट टेबलावर चढत जोरदार घोषणाबाजी केली. या मुख्य अधिकार्‍यांच्या केबिनमध्ये शिरलेल्या आंदोलकांना बाहेर काढताना आमदार बच्चु कडू आणि पोलीस उपअधीक्षक विशाल हिरे यांच्यात मोठी बाचाबाची झाली. तसंच त्यांना शिवीगाळ केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close