26/11च्या हल्ल्यात स्थानिकांचा हात- चिदंबरम

February 4, 2010 3:44 PM0 commentsViews: 3

4 फेब्रुवारीमुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामध्ये काही स्थानिकांचाही हात असल्याचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आयबीएन 18ला दिलेल्या मुलाखतीत कबूल केले आहे. चिदंबरम यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारची कबुली प्रसिद्धीमाध्यमांपुढे दिली आहे. चिदंबरम यांच्या म्हणण्यानुसार अबु जिंदाल या संशयिताच्या आवाजाचे परीक्षण करण्यात येत आहे.त्याच्याबद्दलची अधिक चौकशी करण्यात येत आहे. सीएनबिसी टीव्ही 18 तर्फे वीर संघवी यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत चिदंबरम यांनी ही कबुली दिली आहे. या अबू जिंदालचे खरे नाव सईद जबीउद्दीन अन्सारी असल्याचे बोलले जात आहे. औरंगाबादमध्ये मिळालेल्या बेकायदेशीर हत्यारे प्रकरणी तसेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.तो औरंगाबादचाच रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.

close