छोटा राजनच्या अटकेनंतर दाऊद इब्राहिमच्या सुरक्षेत वाढ

November 3, 2015 2:08 PM0 commentsViews:

Dawood Ibrahim123

03 नोव्हेंबर : छोटा राजनच्या अटकेनंतर कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या सुरक्षेत पाकिस्तानी लष्कराकडून वाढ करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनूसार दाऊदच्या कराची आणि इस्लामाबाद इथल्या निवासस्थानांबाहेर कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

सध्या दाऊदभोवती सुरक्षेचे तिहेरी कडे असून यामध्ये पहिल्या टप्प्यात पाकिस्तानी रेंजर्स, दुसर्‍या टप्प्यात पाकिस्तानी लष्करातील अधिकारी आणि तिसर्‍या टप्प्यात दाऊदचे खासगी अंगरक्षक आणि आयएसआयच्या अधिकार्‍यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर दाऊदने दुबई आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये आश्रय घेतला होता. दाऊद राहण्याची ठिकाणे वेळोवेळी बदलत असला तरी त्याचा मुक्काम हा पाकिस्तानमध्येच असल्याचेही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे 25 ऑक्टोबरला छोटा राजनला अटक झाल्यानंतर पाकिस्तानी लष्कराकडून दाऊदच्या सुरक्षेसाठी विशेष कमांडोचे पथक तैनात केल्याचे सांगण्यात येत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close