कोल्हापुरात आघाडीची सत्ता, काँग्रेसचा होणार महापौर !

November 3, 2015 4:31 PM0 commentsViews:

kolhapur_403 नोव्हेंबर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसने झेंडा फडकावलाय. आणि आता काँग्रेसचा महापौरही होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीवर अखेर शिक्कामोर्तब झालंय. या आघाडीनुसार काँग्रेसचा महापौर आणि राष्ट्रवादीचा उपमहापौर होणार आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 27 जागा पटकावत सर्वात मोठा पक्ष ठरलाय. बहुमतासाठी 41 जागांची आवश्यकता आहे. यासाठी काँग्रेसने आपला मित्रपक्ष राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं. काल सोमवारीच सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन विनंती केली. त्यानंतर आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही काँग्रेस कोल्हापुरात सत्ता स्थापणार आहे.

पतंगराव कदम यांनी मुश्रीफ यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या बैठकीत आघाडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या आघाडीनुसार दोन्ही पक्ष महापौर आणि उपमहापौरपद वाटून घेणार आहे. पहिल्यांदा काँग्रेसचा महापौर होणार आहे. विशेष, म्हणजे कोल्हापुरात भाजप आणि ताराराणी आघाडीने निवडणुकीत चांगल्या जागा जिंकल्यात. एवढंच नाहीतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजपचाच महापौर होईल असा दावाही केला होता. पण, कोल्हापूरकरांनी भाजपला नाकारात काँग्रेसला ‘हात’ दिलाय. आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच महापौर कोण होणार याची घोषणा होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close