चिंता खेळाडूंच्या सुरक्षेची…

February 4, 2010 3:53 PM0 commentsViews: 3

4 फेब्रुवारीआयपीएलचं काऊंटडाऊन आता सुरु झाले आहे. पण तिसर्‍या आयपीएलपूर्वी क्रिकेटपेक्षा सगळीकडे चर्चा रंगतेय ती खेळाडूंच्या सुरक्षेची. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड पाठोपाठ आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. आणि अखेर त्यांच्या आणि टीम मालकांच्या दबावापुढे आयपीएल अध्यक्ष ललित मोदी यांनाही माघार घ्यावी लागली आहे. आयपीएल दरम्यानच्या सुरक्षा व्यवस्थेची माहीती देणार नाही, असे सुरुवातीला म्हणणार्‍या मोदींनी मात्र आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या असोसिएशनला सगळी माहिती देऊ केली आहे. तर स्वतंत्र तेलंगणा वादामुळे आयपीएलच्या मॅच हैद्राबाद ऐवजी विशाखापट्टणमला घेण्याचा पर्याय आयोजकांसमोर आहे. पण आयपीएलला आता जेमतेम एक महिना उरल्यामुळे तेवढ्या वेळात निर्णय घेऊन मग आयोजनात तसे फेरफार करण्याचेही आव्हान आयपीएलसमोर आहे.

close