‘कल्याण’साठी सर्वपर्याय खुले, भाजपने केलं दार मोकळं !

November 3, 2015 4:54 PM0 commentsViews:

kdmc_bjp403 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवलीत कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी राजकीय घडामोडींना आज सकाळपासूनच वेग आला आहे. यासंदर्भात भाजपच्या कोअर कमेटीची बैठक संपली असून आमच्यासाठी सर्वपर्याय खुले असल्याचं भाजप स्पष्ट करत सेनेला निमंत्रण दिलंय. परंतु, चर्चा करुन योग्य तो निर्णय घेणार असल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलंय. भाजपने 42 जागा पटकावल्या आहेत.

तर दुसरीकडे, ‘कृष्णकुंज’वरही मनसेच्या नवनिर्वाचित 9 नगरसेवकांनी राज ठाकरेंची भेट घेतली. याच बैैठकीत सेनेला पाठिंबा द्यायचा की विरोधात बसायचं यावर निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र मनसेनी अद्याप कुठलीही भूमिका घेतल्याचं स्पष्ट केलं नाही. सूत्रांच्या माहितीनुसार काल रात्री मनसेचे नितीन सरदेसाई आणि शिवसेनेचे अनिल परब यांच्यात एक गुप्त बैठकही झाल्याचं कळतंय. दरम्यान, काँग्रेसच्या चार नगरसेवकांवरही भाजप सेनेनं दोन्ही बाजूनं जाळं टाकलंय. सत्तेसाठी आतुर झालेल्या सेना -भाजपने काँग्रेसचे प्रत्येकी 2- 2 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close