धुळ्यात पडला पैशांचा पाऊस, पण…

November 3, 2015 8:14 PM0 commentsViews:

03 नोव्हेंबर : पैशांचा पाऊस पडणे, याचा प्रत्यय आज धुळ्यातील नागरिकांना आला. एक रुपयांची नाणी बनवण्यासाठी लागणारं रॉ मटेरिअल घेऊन जाणार्‍या ट्रकला नरडाणा गावाजवळ अपघात झाला. त्यामुळे ट्रकमध्ये असलेल्या 31 बॅरलपैकी 20 बॅरल पडल्याने महामार्गावर पैसेच पैसे झाले होते.

हा ट्रक बंगलोरहून नोएडाच्या दिशेने जात होता. मात्र मुंबई-आग्रा महामार्गावर नरडाणा गावाजवळ ट्रकला अपघात झाला. दरम्यान, या प्रकारानंतर नरडाणा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत वेळीच उपाययोजना केल्याने महामार्गावर सांडलेली नाणी गोळा करुन सुरक्षित ठेवण्यात आली. यानंतर महामार्ग सुरळीत झाला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close