तो आला..त्याने पाहिले..त्याने जिंकले!

February 5, 2010 9:54 AM0 commentsViews: 2

5 फेब्रुवारीशिवसेनेने केलेली विरोधाची जोरदार तयारी…कधी नव्हे ती काँग्रेसच्या नेत्यांनीही कसलेली कंबर…आणि तणावाच्या वातावरणात कडेकोट बंदोबस्त…अशा वातावरणात काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचे मोठ्या धडाक्यात मुंबईत आगमन झाले. या युवा नेत्याच्या उत्साहाने वातावरणातला तणाव केव्हाच पळाला…आणि तो आला..त्याने पाहिले..त्याने जिंकले! अशा वातावरणात मुंबई राहुलमय झाली!राहुल यांच्या दौर्‍याची सुरूवात झाली ती विलेपार्लेच्या भाईदास सभागृहातून. भाईदास सभागृहात मुंबईतल्या 8 महाविद्यालयातील 500 विद्यार्थ्यांशी विविध मुद्यांवर त्यांनी संवाद साधला.जुहूच्या पवनहंस एअरबेसवरुन राहुल गांधींचा हा ताफा निघाला तो विलेपार्लेच्या भाईदास हॉलकडे. भाईदास सभागृहासमोर राहुल गांधींच्या स्वागताच्या बॅनरने रस्ते झाकून गेले होते. काही गडबड होऊ नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त होता. हे झालं तिथल्या परिस्थितीचं…पण राहुल गांधींबद्दल अधिक उत्सुकता होती, ती त्यांच्याशी संवाद साधू इच्छिणार्‍या तरुणांमध्ये. भाईदासच्या बाहेर तरुणांची गर्दीही लक्षणीय होती. पवनहंसहून निघालेला राहुल गांधींचा ताफा भाईदासवर आला. एकीकडे शिवसैनिकांची ही राजकीय धडपड चालू होती तर, दुसरीकडं भाईदासच्या बाहेर सकाळपासूनच कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गर्दी होती. राहुल गांधींना भेटणं हीच त्यांच्यासाठी खरंतर एक मोठी गोष्ट होती. युवकांनी राजकारणात यावं, असं आवाहन यावेळी राहुल गांधींनी केलं. त्यावर तरुणाईची प्रतिक्रिया अशी होती. राहुलनं एकीकडं आश्वासक भाषण केलं, तर दुसरीकडं ते राजकीय सोयीचंही भाषण करत होते, असं काहींचं म्हणणं होतं.कदाचित काही तरूणांना राहुलचं भाषण आवडलेलं नसेलही. पण, त्याची आणि सगळ्या दौर्‍याचीच चर्चा ह्या तरुणांमध्ये ऐकायला मिळत होती.

close