ज्वालामुखीचा उद्रेकामुळे छोटा राजनचा बालीतला मुक्काम वाढला

November 4, 2015 7:53 AM0 commentsViews:

rajan indonesia

04 नोव्हेंबर : कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा बालीमधला मुक्काम वाढला आहे. इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळं आजही बाली एअरपोर्ट पूर्णपणे बंद असून इथून होणारी सर्व उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे आजही छोटा राजनची घरवापसी लांबण्याची शक्यता आहे.

छोटा राजनच्या प्रत्यार्पणासंदर्भातील औपचारिकता पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्याला भारतात आणले जाणार आहे. छोटा राजनला घेऊन सीबीआयची टीम काल (मंगळवारी) इंडोनेशियातील बालीमधून निघणार होती. पण इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. यामुळे आकाशात राख आणि धूळ पसरल्यामुळे सगळ्या फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे छोटा राजनचं भारतात येणं लांबणीवर पडणार अशी शक्यता आहे.

भारतात आणल्यानंतर छोटा राजनला कुठे ठेवले जाणार हे अजून नक्की नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार छोटा राजनला मुंबईत ठेवलं जाणार आहे. मात्र आधी सीबीआय आणि दिल्ली पोलीस छोटा राजनचा ताबा घेईल. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईतील काही पोलीस हे दाऊदला मदत करतात असा खळबळजनक आरोप छोटा राजनने केला आहे. त्यावर विचारल्यास मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी, “एका गुंडाच्या आरोपांना मला उत्तर द्यायचं नाही”, असं म्हटलं आहे. त्याचबरोबर, राजनच्या सुरक्षेबाबत सर्व पाऊलं उचलली असल्याचंही अहमद म्हणाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close