पोलीस ठाण्यातच मुंबई पोलिसांची तरुण तरुणीला अमानुष मारहाण

November 4, 2015 9:04 AM0 commentsViews:

04 नोव्हेंबर : मुंबई पोलिसांनी पोलिस स्टेशनमध्येच एका तरुण-तरुणीला अमानुष मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अंधेरी पोलीस स्टेशनमधली ही घटना आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

MARHAN!

महिंद्रा कॉल सेंटरवर काम करणारे संबंधित तरुण-तरुणी 2 नोव्हेंबर रोजी रात्री रस्त्यावर भांडत असल्यामुळे त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यांना समोरासमोर बसवून चौकशी सुरू केली. पण पोलिसांनी मुलाला मारहाण सुरू केली. त्यांना रोखायला गेलेल्या मुलीलाही पोलिसांनी चोप दिला. मात्र आपण या जोडप्याचं भांडण सोडवत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान, या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आलेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close