हाफिजकडून शाहरूखला पाकिस्तानात येऊन राहण्याचं निमंत्रण

November 4, 2015 10:17 AM0 commentsViews:

Hafiz-Saeed-and-Shahrukh-Khan

04 नोव्हेंबर : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आणि ‘जमात-उद-दावा’ या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याने शाहरूखला पाकिस्तानात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. ‘भारतात जर एखाद्या मुस्लिमाला धर्माच्या कारणावरून त्रास सहन करावा लागत असेल, तर ते पाकिस्तानमध्ये येऊन राहू शकतात. पाकिस्तान त्यांचा स्वीकार करेल’, असं हाफिज सईद याने म्हटलं आहे. हाफिज सईदने केलेल्या ट्विटमध्ये हे आवाहन केलं आहे.

शाहरूख याने आपल्या 50 व्या वाढदिवसानिमित्त देशात असहिष्णुता वाढत असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यावर भाजप आणि संघ परिवारातील नेत्यांनी शाहरूखवर टीकास्त्र सोडले. भाजप नेते कैलाश विजयवर्गी यांनी शाहरूखवर निशाणा साधताना शाहरुख राहतो भारतात आणि त्याचं चित्त पाकिस्तानात आहे, तो देशद्रोही आहे, असे आरोप केले. तर शाहरूख हा पाकिस्तानचा एजंट असून, त्याला पाकिस्तानात पाठवलं पाहिजे, असा घणाघात साध्वी प्राची यांनी केला होता.

या मुद्यावरून भारतातील वातावरण तापले असताना तिकडे हाफिज याने ट्विटरवरून शाहरूखला पाकिस्तानात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. तसंच शाहरुख खानसोबतच भारतातील खेळ, अकादमी, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील ज्या नामवंत भारतीयांना धर्मामुळे भारतात डावलण्यात येते किंवा अन्याय होतो त्यांनीही पाकिस्तानात यावे, असं त्यानं म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close