कल्याण -डोंबिवलीत युतीचा औरंगाबाद पॅटर्न ?

November 4, 2015 11:15 AM0 commentsViews:

danve and sena
04 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेना-भाजपची युती होण्याची शक्यता आहेत. भाजप शिवसेनेला साथ द्यायला तयार असून यासाठी औरंगाबाद पॅटर्नचं अनुकरण करण्याची तयारी दर्शवली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेने सर्वाधिक 52 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपाने 42 जागांवर विजय मिळवला आहे. सत्तास्थापेनसाठी 61 ची मॅजिक फिगर गाठणं आवश्यक आहे. यासाठी शिवसेना भाजपसोबत जाणार की मनसेसोबत याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपाने शिवसेनेसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. कल्याण डोंबिवलीतही औरंगाबाद पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. यानुसार चार वर्ष शिवसेनेचा महापौर तर एक वर्ष भाजपचा महापौर असेल. तर स्थायी समितीचे अध्यक्षपद तीन वर्ष शिवसेना आणि दोन वर्ष भाजपकडे असेल अशी माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी रात्री भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात बैठक पार पडली. आज भाजपाचे नेते यासंदर्भात शिवसेना नेत्यांसोबत चर्चा करतील असंही समजते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close