बिहारमध्ये भाजपने दिलेल्या गायीच्या जाहिरातीवरून उफाळला नवा वाद

November 4, 2015 3:26 PM0 commentsViews:

BEEF 1321

04 नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा राहिला आहे आणि तिथलं राजकारण तापत चाललं आहे. बिहारमधल्या आजच्या वर्तमानपत्रात भाजपनं एक वादग्रस्त जाहिरात दिली आहे. बिहारमधील पाचव्या टप्प्यातील मतदानाला एक दिवसाचा अवधी शिल्लक असतानाच भाजपाने गाईची जाहिरात देत नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. त्याविरोधात तिथल्या महाआघाडीनं निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

बिहारमधल्या अनेक वर्तमानपत्रात बुधवारी भाजपाची गाईची जाहिरात छापण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये एक महिला गाईला कुरवाळताना दाखवण्यात आली आहे. त्याखाली नितीश कुमार यांच्यावर टीकाही करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्रीजी, तुमचे मित्रपक्ष वारंवार गाईचा अपमान करत असताना तुम्ही शांत होता’ असं जाहिरातीमध्ये म्हटलं आहे. त्यावर नितीशकुमार गप्प का, असा प्रश्न या जाहिरातीत विचारण्यात आला आहे. एवढचं नाही तर ‘उत्तर नाही तर मत नाही’ असंही या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या जाहीरातीत ‘बीफ’ हा शब्द मोठ्या आणि लाल अक्षरात लिहिण्यात आला आहे. भाजपाच्या या जाहिरातीवरुन विरोधी पक्षातील नेते चांगलेच आक्रमक झाले असून याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची तयारीही विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close