गुलाम अलींनी भारतात होणारे कार्यक्रम केले रद्द

November 4, 2015 4:43 PM0 commentsViews:

gulam ali04 नोव्हेंबर : देशात असहिष्णुतेच्या वातावरणावरुन वाद सुरू आहे अशातच आता गझलनवाज गुलाम अली यांनी यापुढे भारतात होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. आपला राजकीय स्वार्थासाठी वापर केल्यानं नाराज असल्यानं गुलाम अलींनी हे कार्यक्रम रद्द केले आहे.

गुलाम अली यांचा मुंबई कार्यक्रम होणार होता. परंतु, शिवसेनेनं या कार्यक्रमाला कडाडून विरोध केला. शिवसेनेच्या विरोधामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर जोरदार वादही झाला होता. त्यामुळे आपला वापर हा राजकीय स्वार्थापोटी होतो त्यामुळे हा वाद मिटेपर्यंत आपण भारतात कार्यक्रम करणार नसल्याचं गुलाम अलींनी सांगितलंय. मुंबईतील कार्यक्रम रद्द झाल्यानंतर दिल्ली गुलाम अली यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलंय. पण, आता गुलाम अली यांनी आता कार्यक्रम रद्द केले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close