शेकाप आमदार जयंत पाटलांच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीचे आदेश

November 4, 2015 7:34 PM0 commentsViews:

jayant_patil_sot04 नोव्हेंबर :  शेकापचे आमदार जयंत पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बेहिशेबीमालमत्तेची खुली चौकशी करा असे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिले आहे.

द्वारकानाथ पाटील यांच्या तक्रारीवरून हे आदेश देण्यात आले आहे. रायगडचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षकांना हे आदेश देण्यात आलेत.

तर आपण कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत. आपल्या नावावर कोणतीही बेहिशेबी मालमत्ता नाही , असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close