दिवाळीत दिवाळं, खासगीपाठोपाठ एसटीचीही 10 ते 20 टक्के भाडेवाढ !

November 4, 2015 7:52 PM0 commentsViews:

ST_Bus.image04 नोव्हेंबर : महागाईने होरपळणार्‍या सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलंय त्यातच ऐन दिवाळीत एसटीने तिकीटांत भाडेवाढ करणाच्या निर्णय महामंडळाने घेतलाय.

एसटी बसच्या तिकीटांत 10 टक्के तर निमआराम एसटी बसच्या तिकीटांत 15 टक्के दरवाढ करण्यात येणार आहे.

शिवनेरीच्या तिकीटात 20 टक्के वाढ करण्यात येणार आहे. मात्र, ही दरवाढ हंगामी असेल. 5 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबरपर्यंतच्या काळात ही नवीन वाढ लागू असणार आहे.

आधीच तिकीट बुक करुन ठेवलं असेल तर सदर प्रवाशांकडून प्रवास करण्याआधी ही वाढलेली रक्कम घेण्यात येईल. या हंगामी तिकीटवाढीनं एसटीला जवळपास 10 कोटींचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलंय. दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही दिवाळीत एसटी महामंडळाकडून अतिरिक्त गाड्या सोडण्यात येणार आहे. दिवाळीच्या काळात खाजगी बस कंपन्यांकडून प्रवाशांची पिळवणूक करुन तिकीटदरात प्रचंड वाढ करण्यात येते, याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून ही दरवाढ करण्यात आलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close