विमान अपघात कॅमेर्‍यात कैद

November 4, 2015 10:30 PM0 commentsViews:

04 नोव्हेंबर - दक्षिण सुदानमध्ये जुबा एअरपोर्टजवळ एका मालवाहू विमानाला अपघात झालाय. हे विमान टेक ऑफ घेतल्यानंतर काही वेळातच कोसळलं. या दुर्घटनेत 40 जणांचा मृत्यू झाला. या विमानात किती प्रवासी होते याबद्दल कळू शकलेलं नाहीये. पण या अपघातात विमानामधला एक कर्मचारी आणि एक छोटा मुलगा मात्र बचावलेत. हे विमान रशियन बनावटीचं होतं. जुबा एअरपोर्टहून उड्डाण केल्यानंतर हे विमान अपर नाईल स्टेटमधल्या पलोचकडे चाललं होतं. तेव्हा या विमानाला अपघात झाला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close