…तर दहशतवादी हल्ले होणार नाहीत

February 5, 2010 12:00 PM0 commentsViews:

5 फेब्रुवारीसरकारने एवढा पोलीस बंदोबस्त रोज ठेवला तर मुंबईवर कधीच दहशतवादी हल्ला होणार नाही, अशी टीका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राहुल गांधींचा दौरा आटोपल्यावर लगेचच उद्धव यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे राहुल गांधी यांच्या विरोधातील आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा केला. एवढा बंदोबस्त पाहून शिवसेनेची हुकुमत किती आहे, हे राहुल गांधीच्या लक्षात आलेच असेल. स्वत: मुख्यमंत्र्यांना फौजदाराच्या भूमिकेत यावे लागले, अशी टीका त्यांनी यावेळी केली. मुंबईत जणू आज इटलीच्या मुसोलिनीची राजवट अवतरली होती. काँग्रेसचे नेते राहुल यांच्या पुढे पुढे करत होते. राज्याचे गृहराज्यमंत्री तर राहुलचे जोडे उचलत होते. अशी टीका करतानाच आमच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात आली. पण अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवून राहुल यांचा निषेध केल्याचा दावा उध्दव यांनी केला. मुंबईची सफर करणारे राहुल गांधी चोर बाजारात गेले असते तर त्यांना कदाचित तेथे शहीद हेमंत करकरेंचे जॅकेट मिळाले असते. राहुल गांधी आणि दिल्लीच्या काँग्रेस सरकारसाठी मुंबई म्हणजे केवळ ATM आहे, अशी टीका उद्धव यांनी केली आहे.

close