हुश्श्य, आजपासून मिळणार 100 रूपये किलो डाळ !

November 5, 2015 7:03 AM0 commentsViews:

nagpur turdal05 नोव्हेंबर : गगनाला भिडलेले डाळीचे भाव खाली उतरवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली होती. आता अखेर सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामन्य ग्राहकांना मोठा दिलासा दिलाय. आज म्हणजे गुरुवारपासून राज्यात 100 रूपये किलो दराने डाळ मिळणार असल्याची घोषणा अन्न आणि नागरीक पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केलीये.

सर्व व्यापार्‍यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. 100 रूपयांपेक्षा जास्त भावानं डाळ विकणार्‍यांवर कारवाई होणार आहे. तसंच जप्त केलेल्या डाळीचा साठाही खुल्या बाजारात आणला जाईल अशी माहितीही बापट यांनी दिली.

तसंच भाजप मुंबईत स्वस्त डाळ विक्री केंद्र उघडणार अशी घोषणाही बापट यांनी केली. मागील महिन्यात डाळीचे भाव गगनाला भिडले होते. 270 किलो असा दर डाळीने गाठला होता. त्यामुळे राज्य सरकारने धडक कारवाई करत कोट्यवधींचा डाळीचा साठा जप्त केला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close