पुण्यात सेना-काँग्रेसमध्ये राडा

February 5, 2010 1:30 PM0 commentsViews: 11

5 फेब्रुवारीएकीकडे मुंबईत राहुल गांधींविरुद्धचे शिवसेनेचे आंदोलन फ्लॉप ठरले असताना पुण्यात मात्र काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या पुतळ्याचे गुडलक चौकात दहन करणार असल्याची बातमी शिवसैनिकांना कळली. त्यातूनच वाद होऊन त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना चोप दिला. तसेच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दोन गाड्यांची तोडफोड केली. नंतर हे शिवसैनिक पळून गेले. याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. दुसरीकडे राहुल गांधींच्या मुंबई दौर्‍याला विरोध केल्याचा निषेध म्हणून नागपुरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन केले.

close