महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार प्रदान

February 5, 2010 2:05 PM0 commentsViews: 8

5 फेब्रुवारीमहाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्काराचे वितरण मालदीवचे उच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते पुण्यात सुरू आहे. साहित्यिक गो. पु. देशपांडे यांना जीवनगौरव देण्यात आला. तर कुमार केतकर, चंद्रकांत पाटील, लक्ष्मीनारायण बोल्ली, चंद्रशेखर फणसळकर यांना साहित्य क्षेत्रातल्या भरीव कामगिरीसाठी गौरवण्यात आले आहेत. याशिवाय व्यंकट अण्णा रणधीर, सुभाष वारे, बंड्या साने, श्रीनिवास कुलकर्णी, योगिता खानोलकर यांना समाजकार्यासाठी पुरस्कार देण्यात आला आहे.पुरस्कारांची यादी पुढीलप्रमाणे- साहित्य क्षेत्र- जीवनगौरव – गो. पु. देशपांडे (स्मृतिचिन्ह आणि 2 लाख रु.)वैचारिक ग्रंथ – कुमार केतकर बदलते विश्व (स्मृतिचिन्ह आणि 25 हजार रु.)चंद्रकांत पाटील यांना कवितांतरण या ललित ग्रंथाकरिता (स्मृतिचिन्ह आणि 25 हजार रु.)लक्ष्मीनारायण बोल्ली एका साळीयाने (स्मृतिचिन्ह आणि 25 हजार रु.)चंद्रशेखर फणसळकर – रा. शं. दातार नाट्य पुरस्कार खेळीमेळी नाटकासाठी (स्मृतिचिन्ह आणि 25 हजार रु.)समाजकार्य पुरस्कार-जीवनगौरव – व्यंकट अण्णा रणधीर (स्मृतिचिन्ह आणि 2 लाख रु.)समाजकार्य प्रबोधन पुरस्कार सुभाष वारे (स्मृतिचिन्ह आणि 50 हजार रु.)समाजकार्य सामाजिक प्रश्न पुरस्कार – बंड्या साने (स्मृतिचिन्ह आणि 50 हजार रु.)समाजकार्य असंघटीत कष्टकरी पुरस्कार – श्रीनिवास कुलकर्णी (स्मृतिचिन्ह आणि 50 हजार रु.)समाजकार्य युवा कार्यकर्ता पुरस्कार – योगिता खानोलकर (स्मृतिचिन्ह आणि 25 हजार रु.)

close