दिवाळीत सुवर्णसंधी, सोन्याचा भाव 26 हजारांच्याही खाली

November 5, 2015 4:50 PM0 commentsViews:

gold rate05 नोव्हेंबर : दिवाळीच्या मुहुर्तावर सोने खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी… सोन्याच्या भावात घसरण होऊन सोन्याचा भाव 10 ग्रॅममागे 26 हजारांपर्यंत येऊन ठेपला आहे.

जागतिक बाजारातील मंदी आणि सराफ बाजारांकडून मागणीत घट झाल्याने सोने दरात घसरण झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर सोनं खरेदी चांगलाच जोर धरेल असं दिसतंय.

मुंबईतील सराफ बाजारात स्टँडर्ड सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 25, 950 इतका झाला. चांदी सुद्धा किलो मागे 36, 570 वर येऊन थांबलीये. त्यामुळे यंदा दिवाळीसाठी सोनं-चांदी खरेदीच्या मागणीत वाढ होणार हे मात्र नक्की .

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close