पुण्यात वसंतोत्सव सुरू

February 5, 2010 2:15 PM0 commentsViews: 1

5 फेब्रुवारीसवाई नंतर पुणेकर आतुरतेनी वाट पाहतात ती वसंतोत्सवाची ..यंदाच्या वसंतोत्सवाला आज सुरुवात झाली आहे. अजय चक्रबर्ती यांच्या गायनाने महोत्सव सुरु झाला आहे. यानंतर त्रिलोक गुर्टुंचा परफॉर्मन्स सादर होणार आहे. शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि भजनांवर आधारित त्रिलोक गुर्टुंचा हा कार्यक्रम वसंतोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. तर उद्याच्या सत्रात शौनक अभिषेकी राहुल देशपांडे आणि जयतीर्थ मउंडी या तीन घराण्यांच्या गायकांचा कार्यक्रम सादर होणार आहे. पुण्याच्या रमणबाग प्रशालेच्या मैदानावर या वसंतोत्सवाचे आयोजन केले गेले आहे. समारोपाच्या दिवशी शर्वरी जमेनिस यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम आणि शेखर सेन यांचा कबीर हे दोन खास कार्यक्रम सादर होणार आहेत.

close