नागपूर-मुंबई 10 तासांत, 6 पदरी सुपर एक्स्प्रेस करारावर शिक्कामोर्तब

November 5, 2015 8:31 PM0 commentsViews:

nagpur_mumbai express way05 नोव्हेंबर : नागपूर-मुंबई सुपर एक्स्प्रेस सहा पदरी महामार्गासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये महत्वाचा करार झालाय. 32 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. 3 वर्षांमध्ये हा रस्ता पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 8 पदरी मार्गांची घोषणा केली होती. पण जमीन हस्तांतराच्या प्रक्रियेत प्रकल्प रखडू नये म्हणून सुरुवातीला तो सहा पदरी मार्ग करण्याचा निर्णय घेतलाय. चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिलीये. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर नागपूर-मुंबई हे अंतर 10 तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. सध्या यासाठी 16 तास लागतात.

हा महामार्ग मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून जाणार आहे. त्यामुळे त्या भागालाही फायदा होणार आहे. सध्या या रस्त्यासाठी लागणारी जमीन सरकारकडे उपलब्ध आहे. सोबतच मुंबई गोवा महामार्गा संदर्भात 50 टक्के जमीन हस्तांतरीत झाल्यानंतर टेंडरिंगच्या कामाला सुरुवात होईल अशी माहिती पाटील यांनी दिली. सोबतचं नितीन गडकरी आणि चंद्रकात पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत 3839 किलोमीटर राज्य मार्ग केंद्रीय महामार्गात परिवर्तीत करण्यात आला. या शिवाय सातार, कागल सहालेन रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. हा रस्ता एमएसआरडीसीच्या माध्यमातून पूर्ण होईल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close