काँग्रेसच्या बैठकीत पवारांवर टीका

February 5, 2010 3:50 PM0 commentsViews: 2

5 फेब्रुवारीवाढत्या महागाईचा आढावा घेण्यासाठी आज काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका करण्यात आली. शरद पवार सांभाळत असलेल्या कृषी आणि अन्न पुरवठा मंत्रालयांच्या कारभारावर या बैठकीत टीकेची झोड उठवण्यात आली. या बैठकीला पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि महाराष्ट्र वगळता.. इतर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती लवकरच खाली येतील, असा आशावाद यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला. सर्व मुख्यमंत्र्यांनी साठेबाजीला आळा घालावा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक प्रभावी करावी, अशा सूचना पंतप्रधानांनी दिल्या. उद्या देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांची महागाईच्या मद्द्यावर बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

close