पान मसाल्याची जाहिरात भोवणार, अजय आणि मनोज वाजपेयीला नोटीस

November 5, 2015 9:13 PM0 commentsViews:

ajay and manoj add05 नोव्हेंबर : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन पान मसालाची जाहिरात करणार्‍या कलाकारांवर लवकरच कारवाई करणार आहे. महाराष्ट्रात पान मसाला आणि गुटखा यावर बंदी आहे. विमल पान मसाला आणि पान विलास मसाला असे आतापर्यंत दोन ब्रँड आहेत. त्यामुळे पान मसाल्याची जाहिरात करणारे मनोज वाजपेयी, अजय देवगण या कलाकारांना लवकरच नोटीस बजावण्यात येईल.

पण शाहरूख खानला मात्र यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरूखने केलेली जाहिरात ही सुगंधी वेलचीची असल्यामुळे त्याला दिलासा मिळू शकतो.

एफडीए अन्न सुरक्षा कायदा 2006 च्या 24 कलमा अंतर्गत नोटीस दिल्या जाणार आहेत. आणि याच कायद्याच्या कलम 54 अंतर्गत 10 लाखांचा दंड होऊ शकतो. कलाकारांसह ऍड एजेंसीवर कारवाई करता येईल का? याचाही अभ्यास एफडीए करतंय. ग्राहक पंचायत समिती पान मसाल्याची जाहिरात करणार्‍या कलाकारांची ही नैतिकच नाही तर कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी या अशा जाहिराती करू नयेत. कारण लाखो लोक त्यांना रोल मॉडेल म्हणून अनुकरण करत असतात असं मत मुंबई ग्राहक पंचायतचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी मांडलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close