‘ज्वेलर्स’वर दरोड्याचा प्रयत्न, थरार सीसीटीव्हीत कैद

November 6, 2015 11:26 AM0 commentsViews:

06 नोव्हेंबर : पिंपरी चिंचवडमध्ये सराफा व्यापार्‍यावर अज्ञात गुंडांनी तीक्ष्ण हत्यारांनी वार करत आणि दुकानातील दागिन्यांची लूट केल्याची धक्कादायक घटना घडली. गुंडांचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये कैद झाले असून याप्रकरणी वाकड पोलिसांनी तिघा अज्ञात गुंडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

CCTV footage123

काळेवाडी परिसरात दिनेश सोनी यांच्या मालकीचे हरिओम ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. गुरुवारी ते आपल्या दुकानात बसले होते. त्यावेळी संध्याकाळी सहाच्या सुमारास तीन अनोळखी तरुण दुकानात घुसले आणि ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर बंद केलं. त्यानंतर त्यांनी सोनी यांना बंदूक आणि धारदार शस्त्रचा धाक दाखवत लूट केल्याची माहिती मिळतीये. या घटनेत दुकानाचे मालक दिलीप सोनी जखमी झाले असून त्यांच्या दुकानातील 8 ते 10 तोळे सोने लुटल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दुकानाची पाहणी केली. दुकानात सीसीटीव्ही लावण्यात आल्यामुळे तीनही चोरटे त्यामध्ये कैद झाले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाकड पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारी अशी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाहनांची तोडफोड, चैन स्नॅचिंग, विनयभंग आणि लुटमारीचे प्रकार इथे सातत्याने घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close