मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस

November 6, 2015 2:22 PM0 commentsViews:

Sahitya samelan

06 नोव्हेंबर : ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांची 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर यांनी मतमोजणीनंतर श्रीपाल सबनीस यांच्या विजयाची घोषणा केली.

संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ कवी प्रा. विठ्ठल वाघ, लेखक शरणकुमार लिंबाळे, लेखक-प्रकाशक अरूण जाखडे, श्रीनिवास वारुंजीकर आणि श्रीपाल सबनीस असे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यंदाच्या या निवडणुकीत ऐतिहासिक मतदान झालं होतं.

पुढील वर्षी जानेवारीमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये हे संमेलन होणार आहे. पिंपरी इथले डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ या संमेलनाची संयोजक संस्था आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close