प्रांतवादाचाही देशाला धोका

February 7, 2010 12:06 PM0 commentsViews: 1

7 फेब्रुवारीदहशतवाद आणि नक्षलवादाप्रमाणेच प्रांतवादाचे राजकारण करणार्‍या लोकांचाही देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका आहे, असे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी म्हटले आहे. देशांतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज पंतप्रधानांसोबत बैठक झाली. त्यावेळी शिवसेना, मनसेचे नाव न घेता पंतप्रधानांनी ही टीका केली आहे. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी गेले काही दिवस मराठीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाचा समाचार घेतला. पाकिस्तानी दहशतवाद आणि नक्षलवाद देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तर यावेळी सुरक्षा दलांमध्ये मनुष्यबळाचा अभाव, ही मोठी समस्या असल्याचे चिदंबरम यांनी नमूद केले. म्हणूनच सुरक्षा दलांमध्ये भरती प्रक्रिया वेगात सुरू करा, अशी सूचनाही त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना केली.

close